होंडाच्या ‘तगड्या’ अडव्हेंचर बाइक्स बाजारात हजर, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Honda Debuts 2024 NX400 and CBR400R in Japan: Honda ने जपानमध्ये 2024 NX400 आणि CBR400R मोटरसायकल सादर झाल्या असून, होंडाच्या दोन्ही बाईकमध्ये समान प्लेटफॉर्म, प्रभावशाली वैशिष्ट्ये आणि अत्याधुनिक सुधारणानी डेव्हलप केल्या गेल्या आहेत. भारतामध्ये या दोन्ही बाईक 2024 च्या अखेरीस लाँच होण्याची अपेक्षा आहे, Honda NX400 आणि CBR400R ची अपेक्षित किंमत रु. 4.9 लाख आणि रु. 5.1 लाख असून चला जाणून घेयूया, या दोन्ही बाईकचे स्पेसिफिशन्स, इंजिनसोबत अधिक माहिती

Honda NX400 आणि CBR400R मधले कॉमन फिचर्स

  • रायडर्सना रस्त्यांच्या हर- एक प्रकारच्या परिस्थितीवर कंट्रोल करण्यासाठी या बाईकमध्ये होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) देण्यात आला आहे.
  • दोन्ही बाईकमध्ये 5-इंच पूर्ण-कॅलरफुल TFT डिस्प्ले असणार आहे, ज्यामध्ये ड्राइवरला लागणाऱ्या गरजेच्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
  • Honda RoadSync ॲप इंटिग्रेशन दिल गेलं आहे, ज्याच्या मदतीने ऍपला मोबाईल कनेक्ट होऊ शकतो.

होंडा CBR400R फिचर्स

Honda CBR400R इन्स्ट्रुमेंट कन्सोल मध्ये सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल आणि 5-इंचाचा कॅलरफुल TFT डिस्प्ले, Honda RoadSync app ज्यामध्ये; कॉल, संदेश, म्यूजिक आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनम वापरण्यासाठी ब्लूटूथ ऑप्शन दिला गेला आहे, जो तुम्ही तुमच्या  स्मार्टफोनला कनेक्ट करू शकता. या बाईकमध्ये नवे स्टाइलिंग अपडेट केले असून, डिजिटल स्पीडोमीटर, ॲनालॉग टॅकोमीटर , डिजिटल ट्रिप मीटर असून यामध्ये आरामदायी वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट, पिलियन फूटरेस्ट , स्टेप-अप सीट/स्प्लिट सीट मिळतात.

6 गिअर्स असणाऱ्या या बाईकमध्ये लिक्विड कूलिंग इंजिन दिल गेलं आहे जे 399 सीसी चे आहे. या इंजिनची कमाल शक्ती 45.4 HP @ 9500 rpm आणि कमाल टॉर्क 37 Nm @ 7500 rpm जनरेट करण्याची क्षमता आहे. या बाईकच्या सीटची उंची 785 मिमी तर  ग्राउंड क्लिअरन्स 140 मिमी इतका आहे. बाईकच्या इंधन टाकीची क्षमता 15 लिटर आहे.

वाचा: एमजी झेडएस ईव्ही चक्क 3.9 लाख रुपयांनी कमी, MG motors कारकिंमतीत ‘मोठी घसरण’

होंडा CBR400R किंमत

रंग पर्याय ग्रँड प्रिक्स रेड, मॅट जीन्स ब्लू मेटॅलिक, मॅट बॅलिस्टिक ब्लॅक मेटॅलिक ह्या रंग पर्यायामध्ये उपलब्ध असणारी CBR400R ची अपेक्षित किंमत 4,20,000 रुपये असण्याची शक्यता मांडली जातेय.

वाचा: टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

होंडा NX400 फिचर्स

Honda CBR400R प्रमाणेच 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले 399cc चे वॉटर-कूल्ड इंजिन जे 46 PS कमाल पॉवर आणि 38 Nm पीक टॉर्क जनरेट करत. NX400 बाईकचा टॉप स्पीड 220 किमी/प्रति तास आहे आणि तो तर 28 किमी/लिटर मायलेज आहे.

या बाईकच्या मोजमापाची माहिती देताना NX400ची 2150 मिमी लांबी, 830 मिमी रुंदी आणि 1390 मिमी उंची आहे तर बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 150 मिमी इतका आहे. बाईकमध्ये पुढचे चाक 19-इंच तर मागचे चाक 17-इंच असून समोर डबल डिस्क ब्रेक, सिंगल डिस्क ब्रेक आणि मागचा ड्रम ब्रेक आहे.

वाचा: ओला S1 प्रो वर मिळतोय 25 हजार डिस्काऊंट, ऑफरचा लाभ कसा घ्यावा जाणून घ्या

होंडा NX400 रंग आणि किंमत

होंडा NX400 ची किंमत 891,000 येन म्हणजेच अंदाजे 4.93 लाख आहे, थोडक्यात या दोन्ही बाईक रु. 4.9 लाख ते रु. 5.1 लाख दरम्यान किमतीमधल्या आहेत. पर्ल ग्लेअर व्हाइट आणि मत बालिस्तिक ब्लैक मेटलिक  या दोन रंग पर्यायामध्ये ही बाईक उपलब्ध असणार आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment