Babar Azam New Car Lamborghini: पाकिस्तानी क्रिकेटर, बाबर आझम कोटींची सुपरकार घेऊन झाला ट्रोल, वाचा कारण

Ajinkya Sidwadkar

Babar Azam Lamborghini Car: पाकिस्तानी क्रिकेट टीम कॅप्टन आणि स्टार बॅट्समन बाबर आझम नुकतीच लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर सुपरकारसोबत पोज दिलेला फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत असून युजर्स त्याला एका भारतीय चित्रपटाचे नाव घेऊन चिडवत असल्याचे कॉमेंट बॉक्स मध्ये निदर्शनास आले आहे.

Babar Azam New Car Lamborghini Aventador

पाकिस्तानचा विस्फोटक स्टार बॅट्समन आणि सध्याचा कॅप्टन बाबर आझम नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धा २०२३ मध्ये चांगला खेळ करू शकला नाही तरी देखील त्याच्या चाहतावर्ग कमी झाला नाही किंवा त्याचे प्रेम कमी झाले नाही. ज्याप्रमाणे बाबर त्याच्या खेळी मुळे प्रसिद्ध आहे त्या प्रमाणेच तो विदेशी महागड्या कार्सवर प्रेम करणारा म्हणून देखील ओळखला जातो. बाबर ने नुकतीच लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर सुपरकार घेतली असून २७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्याच्या एका चाहत्याने फोटो काढून सोशलमीडिया वर अपलोड केला असून तो सर्वत्र शेअर केला जात असून प्रचंड ट्रेंड करत आहे. बाबर आझम त्याच्या अलीकडेच खरेदी केलेल्या लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर सुपरकारसोबत पोज देताना दिसला ज्यामध्ये तो ड्रायवर साईडला डोर ओपन करून पोज देताना दिसत आहे. सोशल मीडिया वर हि इमेज अपलोड होताच त्याच्या महागड्या सुपरकारची तुलना टारझन: द वंडर कार या भारतीय चित्रपटातील पर्पल स्पोर्ट कारशी होत असून अनेकजण त्याला या गाडीवरून ट्रोल करत आहेत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

टारझन: द वंडर कार मधील गाडीचा रंग हा पर्पल होता आणि बाबर आझमच्या या नवीन लॅम्बोर्गिनीच्या एव्हेंटाडोरचा रंग सुद्धा पर्पल असल्याने दोन्ही गाड्यांची तुलना करून त्याला ट्रोल करत आहेत. काही युजर्स त्याला सेकंड हॅन्ड गाडी घेतल्यावरून सुद्धा ट्रॉल करत असल्याचे दिसून आले. तुम्हाला सांगू इच्छितो कि लॅम्बोर्गिनीच्या एव्हेंटाडोर लाँच च्या दशकभरा नंतर २०२२ मध्ये डिस्कांटिनू करण्यात आली आहे त्यामुळे बाबरने घेतलेली हि कार सेकंडहँड असल्याचे दिसत आहे त्यामुळे सोशल मीडिया वापरकर्ते त्याला ट्रोल करत आहेत.

वाचा – Maruti jimny thunder edition: विकत घ्या “दोन लाखांनी” स्वस्त मारुति जिम्नी, जाणून घ्या नवी किंमत आणि शेवटची तारीख

वाचा – Tesla Cybertruck unveiled: टेस्ला सायबर ट्रक बद्दलची आवश्यक माहिती ,पाहा किंमत आणि फीचर्स

बाबर आझम विदेशी महागड्या कार्सचा चाहता असून काही महिन्यांपूर्वी बाबर आझमला त्यांच्या कुटुंबाकडून 8 कोटी रुपयांची पांढरी ऑडी ई-ट्रॉन जीटी भेट म्हणून मिळाली होती. Aventador व्यतिरिक्त, बाबर आझमच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये Audi A5, Audi e-Tron GT आणि Hyundai Sonata यांचा समावेश आहे. A5 ही त्याची सुरुवातीची लक्झरी कार होती. बाबर कडे BAIC BJ40, जीप रँग्लर आणि महिंद्र थार यांच्यासारखी दिसणारी चायनीज एसयूव्ही देखील आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version