होंडाच्या कार्स महागणार, जाणून घ्या कारणे आणि नवी किंमत

सध्याच्या घडीला ‘वाहन महागाई’ हि गोष्ट आता आपल्यासाठी काही नवीन राहिली नाही, कारण Tata आणि Maruti Suzuki कंपनीच्या गाडी महागाईच्या बातमीनंतर, आता होंडा इंडिया ने सुद्धा नवीन वर्षात भारतातील प्रवासी Honda वाहनांची महागाई होणार आहे, अशी चर्चा चालू आहे. जपानी कार निर्मात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतात उत्पादन खर्च वाढल्यामुळे येत्या नवीन वर्ष्याच्या पुढील महिन्यापासून भारतातील सर्व कारच्या किमतीत वाढ करणार आहेत. आणि यामध्ये होंडा कार्स इंडियाच सुद्धा नाव आहे.

  • Honda Cars India मॉडेलच्या किमती वाढवण्याची कारणे
  • जानेवारी 2024 पासून होंडा कार्स मॉडेलच्या सुधारित होणारी किंमत 

Honda Cars India मॉडेलच्या किमती वाढवण्याची कारणे

Honda पुढील महिन्यापासून भारतात कारच्या किमती

पीटीआयशी बोलत असताना; कुणाल बहल, जे होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष आहेत यांनी होंडा कार मधल्या पुरवल्या जाणाऱ्या खर्चावरील येणाऱ्या प्रेशरमुळे हि कंपनी पुढील महिन्यापासून म्हणजेच 2024 च्या सुरवातीपासूनच Honda Cars च्या मॉडेलच्या किमती वाढवनार असल्याची माहिती दिली. वाहनाच्या बाजारपेठेतली महागाई काही आता नव्याने चघळायचा विषय नाहीये कारण,टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज-बेंझ इंडिया नंतर होंडा कार्स पण आता ह्या महागाईच्या यादीत हजेरी लावली आहे.

2024 पासून हि असेल होंडा कार्स मॉडेल्सची किंमत 

महिंद्रा & महिंद्र ,ऑडी इंडिया आणि मारुती सुझुकी या कंपन्या जानेवारी 2024 पासून गाड्यांच्या किमतीत वाढ करत असल्याची खबर असताना, आता Honda Cars India सुद्धा आता ‘जानेवारी 2024’ पासून गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे, मात्र हि किंमत ‘चालू असणारी महागाई यासोबत वस्तूंच्या आयात-निर्यातीत घडणाऱ्या दरांमुळे होणारा खर्चाचा दबाव’ यावर अवलंबुन आहे. आणि लवकरच होंडा कार्स च्या वाहनांची किंमत जगासमोर येईल. जर तुम्हीसुद्धा होंडा कार्स चे फॅन आहेत तर वर्षा अखेरपर्यंत तुमच्या आवडीची ‘होंडा कार्स इंडिया’ चे वाहन खरेदी करू शकता.

हेपण वाचा:

Bajaj Chetak Urbane: जास्त रेंज परवडणाऱ्या किमतीत दमदार एंट्री, जाणून घ्या फिचर्स आणि ऑन रोड किंमत

Tata Zephyr Launch Date in India: कॉन्सेप्ट कि सत्यात उतरणार, वाचा सविस्तर

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment