ह्युंदाईच्या फॅमिलीमध्ये दीपिका पदुकोणची एंट्री, Thar पेक्षा अधिक पॉपुलर नव्या ह्युंदाई क्रेटाचे दीपिकाहस्ते अनावरण

बॉलीवूडची डिम्पल गर्ल दीपिका पदुकोण हिची Hyundai Motor India Limited या कार च्या लोकप्रिय कंपनीसाठी ‘ब्रँड अँबॅसिडर ‘म्हणून निवड झाली आहे. ग्लोबल टाइम मॅगझीन मधल्या ‘टॉप 100’ प्रभावशाली लोकांमधून दीपिका पदुकोणसुद्धा एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, जे आता शाहरुख खानसोबत ह्युंदाईच्या जाहिरातींमध्ये दिसून येणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन ह्युंदाई कंपनीची नवीन SUV Hyundai Creta फेसलिफ्ट चे अनावरण करणार आहे. 
ह्युंदाईच्या सेगमेंट मधली सर्वात लोकप्रिय कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्युंदाई क्रेटाचे नव्याने फेसलिफ्ट होत आहे. 2024 च्या नव्या वर्षात क्रेटाच फेसलिफ्ट मॉडेल आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. मारुती सुझुकीनंतर ह्युंदाईच्या कार ची सर्वात जास्त विक्री होत आहे. बऱ्याच वेळा ह्युंदाई क्रेट फेसलिफ्ट च्या मॉडेलला चाचणी करताना पाहण्यात सुद्धा आलं असून, क्रेटा फेसलिफ्ट च्या एक्सटेरिअर- इंटिरियर बद्दल अनेक बदलांची शक्यता मांडली जातेय.
Deepika Padukone will sell Hyundai cars

ह्युंदाई क्रेटाचे एक्सटेरिअर

क्रेटा फेसलिफ्ट एक्सटेरिअर म्हणजे बाहेरील बाजूस संपूर्ण नवीन डिझाइन दिले गेले आहे. खासकरून हेडलॅम्प डिझाइनमध्ये बदल करत नवीन एलईडी डीआरएल , इंडिकेटर्स आणि मागच्या बाजूचे टेल लॅम्प अजूनच आकर्षक दिसून आले. क्रेटा फेसलिफ्टच्या बदलांमध्यें नवीन रियर बंपर ,टेलगेट, फ्रंट ग्रिल आणि रिवाइज्ड फ्रंट यांचा सुद्धा समावेश आहे.

Thar पेक्षा अधिक पॉपुलर नव्या ह्युंदाई क्रेटाचे फीचर अपडेट्स

नव्या Hyundai Creta फीचर अपडेट्सबद्दल अधिक माहिती देता; 6 एअरबॅग्ज, एडजस्टेबल स्टेबल हेडरेस्ट, ड्युअल टोन अपहोल्स्ट्री, कॉम्पॅक्ट स्पेस, साइड एसी व्हेंट्स, कनेक्टेड स्क्रीन, ड्राइव्ह मोड , डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, EBD, नवीन अलॉय व्हील्स चा सेट, या वैशिष्टयांचा समावेश आहे. लहान मुलांच्या आणि प्रौढ रहिवासी सुरक्षिततेसाठी अधिक फीचर्स या गाडीतून दिले जाण्याची शक्यता मांडली जातेय. 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एंट्री, पॅनोरॅमिक सनरूफ, पुश स्टार्ट-स्टॉप बटण, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी हे फीचर्ससुद्धा या गाडीमध्ये देण्यात आले आहेत.
या बाबतीत अधिक माहिती देताना,ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे ​​सीओओ श्री तरुण गर्ग आनंद व्यक्त करत सांगितले कि, आमच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून जागतिक भारतीय आयकॉन दीपिका पदुकोनची निवड झाल्याचा आम्हाला आनंद झाला आहे. लोकप्रिय दीपिकाच्या ह्युंदाईच्या कुटुंबात येण्याने कंपनीला फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. या आधी पॉपुलर नव्या ह्युंदाई क्रेटाचे प्रतिस्पर्धक टोयोटा हायरायडर, नवीन किया सेल्टोस, नवीन होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर आणि एमजी अ‍ॅस्टरशी होऊ शकते.
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment