60 हजारांचा डिस्काउंट मिळतोय, ईव्ही स्कूटर घेण्याची योग्य वेळ?

काय ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याची योग्य वेळ आहे? सर्व ईव्ही कंपन्या 20 हजार ते 60 हजार रुपयाना पर्यंत डिकाउंट देत आहे. तस पाहिलं तर उत्सवाचा काळ नाहीये मग कंपन्याच ग्राहकांवर इतकं प्रेम वाढण्याचं कारण काय? आणि कोणती कंपनी किती डिस्काऊंट देत आहे जाणून घेऊया आजच्या या लेखा मध्ये. पण पैश्याचं नुकसान करायचं नसेल तर शेवटी मी एक महत्त्वाची बाब सांगितली आहे ती नक्की वाचा.

कंपन्यांची डिस्काउंट देण्याची घाई का?

Ola S1 X

तुमच्या कानावर आलच असेल की 31 मार्च 2024 नंतर फेम 2 ही केंद्र सरकारची सबसिडी संपणार असून त्या नंतर दुचाकी साठी उपलब्ध असलेली 22000 रुपया पर्यंतची सबसिडी ग्राहकाना मिळणार नाही. तुमच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल कंपन्या आत्ता का डिस्काउंट देत आहेत पण सबसिडी संपल्यानंतर 1 एप्रिल पासून डिस्काउंट द्यायला पाहिजे ना? त्याच्या मागच मुख्य कारण आहे सबसिडी मध्ये राहिलेली शिल्लक राशी. सरकार ने फेम 2 सबसिडी लागू केली त्यावेळेस 10 हजार करोड रुपये जाहीर केले होते, सध्या या राशीतले 2 हजार करोड रुपये शिल्लक राहिले असून कंपन्या आता याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

1 एप्रिल नंतर कंपन्यांना मार्केट मध्ये टिकायचं असेल तर सबसिडी बंद होऊन सुद्धा कमी किमती गाडी विकणं अनिवार्य असे. शिवाय 2000 करोड मधली सबसिडी वापरली नाही तर ती लॅप्स होईल. मग जर मार्च महिन्यातच डिस्काऊंट दिला आणि सबसिडी सुद्धा ग्राहकांना मिळाली तर दोघांचा फायदा होईल.

ग्राहकांचे पैसे वाचतील आणि कंपन्यांच्या सेल मध्ये, ग्राहकांच्या नोंदी मध्ये वाढ होईल मग भविष्यात सर्विस आणि इतर गोष्टी आल्याच ज्याने फायदा होईल. त्यामुळे कंपन्यांनी सध्या डिस्काउंट चा जोर लावला आहे. ग्राहकानी याचा पुरे पूर फायदा घ्यायला हवा कारण अशी संधी परत तुम्हाला कधीच मिळणार नाही. 1 एप्रिल पासून 20 ते 30 हजार रुपयांपर्यंत वाहनांच्या किमती वाढतील. त्यामुळे “त्वरा करा”.

आता बघूयात कोणती कंपनी किती डिस्काउंट देत आहे.

कंपन्यांचा डिस्काउंट –

या लिस्ट मध्ये सर्व ब्रँडेड इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि बाइक मैनुफेक्चरर यांचं स्थान दिले आहे. चायनीज कचरा असलेल्या गाड्याना सबसिडी मिळत नाही त्यामुळे ते यात नाहीत आणि तसल्या गाड्या घेऊ पण नका.

टॉर्क मोटर्स –

टॉर्क मोटर्स च्या kratos R या इलेक्ट्रिक बाईकवर 31 मार्च पर्यंत तब्बल 37,500 रुपयांचा मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ऑफर नंतर ही बाइक आता 1 लाख 50 हजार रुपयांच्या एक्स शोरूम किमती मध्ये उपलब्ध आहे. kratos R मध्ये 9 kw मोटर आणि 4 kWh बैटरी पैक दिला आहे. 105 km चे टॉप स्पीड आणि 180 km ची सर्टिफाईड रेंज या गाडीमध्ये मिळते.

टीव्हीएस आयक्यूब –

टीव्हीएस कंपनीच्या आयक्यूब या इलेक्ट्रिक स्कूटर वर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. कंपनी 5 वर्ष एक्सटेंडेड वॉरंटी सुद्धा यामध्ये देत आहे. आयक्यूबच्या बेस मॉडल ची किंमत यामुळे 1 लाख 29 हजार रुपये ऑन रोड झाली आहे आणि S या मॉडल ची किंमत 1 लाख 34 हजार रुपये ऑन रोड झाली आहे. आयक्यूब बेस आणि येस मॉडल मध्ये 4.4 kw ची bldc मोटर मिळते सोबत 3.04 kWh ची बैटरी दिली जाते. ही स्कूटर 100 किमी ची रेंज प्रदान करते आणि 78 km चे टॉप स्पीड यामध्ये मिळते.

बजाज चेतक –

सध्या मार्केट मध्ये कोणत्या गाडीची सर्वात क्रेझ असेल तर ती बजाज चेतक आहे. पण कंपनी कोणताच डिस्काऊंट देत नाहीये. डिस्काउंट नसून ही अर्बन मॉडल सध्या 1 लाख 15 हजार रुपयांत मिळते आहे आणि प्रीमियम 1 लाख 35 हजारांत मिळते आहे. हा पण 1 एप्रिल नंतर ही किंमत 22 हजारांपर्यंत वाढू शकते.

अथर एनर्जी –

अथर एनर्जी सध्या भारतीय मार्केट मध्ये 24 हजार रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. हा डिस्काऊंट 31 मार्च पर्यंत वैध असणार आहे. या ऑफर नंतर अथर 450 एस या मॉडल ची किंमत 1 लाख 9 हजार रुपये एक्स शोरूम झाली आहे. अथर 450x च्या मॉडल 2.9 kWh बैटरी पैक ची किंमत आता 1 लाख 38 हजार आणि 3.7 kWh बैटरी पैक मॉडल ची किंमत 1 लाख 44 हजार रुपये इतकी आहे या किमती एक्स शोरूम आहेत. अथर 450S आणि Ather 450x मध्ये 2.9 kWh बैटरी 90 km टॉप स्पीड आणि 90 किमी ची खरी रेंज दिली जाते. 450x मध्ये 3.7 kWh बैटरी पैक ऑप्शन आहे त्यामध्ये 110 km ची खरी रेंज मिळते.

बाउंस –

बाउंस या कंपनीची इंफिनिटी इ 1 स्कूटर असून या स्कूटरवर 17,700 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. E.1+ या बेस मॉडल ची किंमत आता 90 हजार रुपये झाली असून. E.1 LE ची 95 हजार आणि E.1 ची 1 लाख 5 हजार रुपये एक्स शोरूम किंमत झाली आहे. E.1+ आणि E.1 LE या दोन मॉडल मध्ये 1.9 kWh आणि 70+ km ची रेंज. 65 kmph टॉप स्पीड दिल जात आहे. तर E1 मध्ये 2.5 kWh आणि 100+ km ची रेंज. 55 kmph टॉप स्पीड दिल जात आहे.

हीरो विडा –

हीरो मोटोकोर्प तर्फे येणाऱ्या विडा इलेक्ट्रिक स्कूटर वर सध्या 47,000 रुपयांचा तगडा डिस्काउंट दिला जात आहे. कंपनीच्या V1 प्लस या गाडीची किंमत होते ₹1,15,000 आणि प्रो मॉडल ची किंमत होते ₹1,45,900. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत. विडा V1 प्लस मध्ये 3.4 kWh बैटरी आणि 6 kw मोटर दिली जाते. या मॉडल मध्ये 80 किमी टॉप स्पीड आणि 100 किमी रेंज मिळते. विडा V1 प्रो मध्ये 3.9 kWh बैटरी आणि 6 kw मोटर दिली जाते. या मॉडल मध्ये 80 किमी टॉप स्पीड आणि 110 km किमी रेंज मिळते.

ओला इलेक्ट्रिक –

ओला इलेक्ट्रिक सध्या भारतातील सर्वात जास्त इलेक्ट्रिक स्कूटर विकणारी कंपनी असून 25 हजार रूपयांपर्यंत डिस्काउंट सध्या ओला च्या वेगवेगळ्या मॉडेल्स वर मिळत आहे. या व्यतिरिक्त जागतिक महिला दिना निमित्त अतिरिक्त 2 हजार डिस्काऊंट आणि 8 वर्षाची वॉरंटी सुद्धा दिली जात आहे. S1 Pro हे मॉडल आता फक्त 1,29,999. रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे. S1 Air 1 लाख 5 हजार तर S1 X+ 85 हजार रुपयांच्या एक्स शो रूम किमतीत मिळते आहे. S1 Pro मध्ये 11 kW मोटर, 120 kmph टॉप स्पीड, 195km रेंज आणि हायपर मोड, हिल होल्ड, क्रुझ कंट्रोल यांसारखे फिचर्स मिळतात. S1 Air आणि S1 X+ मध्ये 6kW मोटर, 90 kmph टॉप स्पीड, 151 km रेंज मिळते.

शेवट –

तुम्ही वाचलं असेल की कोणत्या कंपनीच्या स्कूटरवर किती डिस्काऊंट मिळतो आहे. सध्या मी सांगितलेल्या पैकी कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही खरेदी करू शकता. 31 मार्च 2024 च्या आधी जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेतली आणि तुम्हाला डिलीवरी अगदी एप्रिल मध्ये जरी करण्यात आली तरी सुद्धा तुम्ही फेम सबसिडी साठी पात्र ठरणार आहात त्यामुळे शक्यतो आत्ताच गाडी बुक करुन ठेवा.

धन्यवाद जय महाराष्ट्र..!

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment