EV जगातली आजपर्यंतची रोल-रॉइसची ‘चॅलेंजिंग’ घोषणा…!

Ajinkya Sidwadkar

तुम्हाला माहितीच आहे कि वाहनांमधलं आपलं भविष्य हे केवळ EV म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांवर अवलंबून आहे. हे गाड्यांमधील सगळ्याचं कंपनीनी मनावर घेतलंय असं दिसतंय, खासकरून रोल-रॉइस कंपनीने. कारण नुकतेच BMW चे अध्यक्ष -ऑलिव्हर झिपसे यांनी चर्चा करत सांगितले आहे, कि  लक्झरी कार्ससाठी प्रसिद्ध असलेली Rolls-Royce लवकरच ICE (Internal Combustion Engine) मॉडेल पूर्णपणे बंद करणार आहे, आणि त्याच कारण हे आहे कि, Rolls-Royce कंपनी पुढील दशकाच्या सुरवातीपासून संपूर्ण इलेक्ट्रिक अल्ट्रा लक्झरी कार चा ब्रँड बनणार आहे.आलिशान कार चे ब्रँड रोल्स रॉयस कार हे भविष्यात पेट्रोल-डिझेल गाड्या बंद करून जग आता EV गाड्यांवर चालवणार आहे. म्हणूनच रोल-रॉइस स्पेक्टर EV कार हि रोल-रॉइस कंपनीने रचलेला नवा पायंडा आहे.

या लेखातले ठळक मुद्दे

  • रोल-रॉइस कंपनीची पहिली EV: रोल्स रॉयस कार स्पेक्टर EV इंजिन माहिती
  • EV च्या जगातले बलाढ्य देश

रोल-रॉइस स्पेक्टर EV : इंजिन

ऑटोमॅटिक लक्झरीने वैशिष्टपूर्ण असणारी आणि ५२० किमी रेंज देणारी Rolls-Royce Specter EV- रोल-रॉइस स्पेक्टर EV आलिशान कार हि या कंपनीची पहिली EV आहे. Specter EV चा 4.5 सेकंदात 0 ते 100 किमी वेग असून 577HP ची शक्ती आणि 900NM चा पीक टॉर्क तयार करण्याची क्षमता आहे. रोल-रॉइस या ब्रँडच्या लाइन-अपमधली रोल्स रॉयस स्पेक्टर हि अशी एकच गाडी आहे, जिला दोन-दरवाजे दिले आहेत.

सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन कंपनी असणारे देश

संपूर्ण इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात अव्व्लल स्थानी चीन नंतर अमेरिका, हे देश असूनसुद्धा आत्ताच EV मार्केट मंदावला आहे पण तरीही Rolls-Royce तगडी टक्कर देत सगळ्यांवर भारी पडत आहे.

जागतिक स्तरावर हिरो मोटोकॉर्पचा ‘या’ स्कूटरसोबत मोठा कमबॅक…!

दिवाळीच्या ऐन मोक्यावर, OLA स्कुटर रेकॉडब्रेकिंग विक्रीमुळे पुन्हा चर्चेत…!

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment

Exit mobile version