नव्या ‘यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरला’ मिळणार, Ola आणि Ather सारखी खासियत

Published:

Yamaha Neo Electric Scooter: नव्या वर्षात अनेक इलेक्ट्रिक वाहन कंपन्या वाहन बाजारपेठेत हजेरी लावत असताना, भारतीयांचं लोकप्रिय ब्रँड Yamaha सुद्धा स्वतःच्या पहिल्या-वाहिल्या यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर ने इलेक्ट्रिक वाहनक्षेत्रात एंट्री करत आहे. भारतासोबत संपूर्ण जगभरात इलेक्ट्रिक वाहनांचा होणारा प्रसार आणि वापर लक्षात घेऊन, ‘यामाहा मोटार’ हि कंपनी स्वतःची एक स्टाइल आणि कॉम्पैक्ट इलेक्ट्रिक स्कुटरसोबत मोबिलिटी इंडस्ट्रीत उतरत आहे. यामाहा मोटारसायकलच्या लोकप्रिय फेसिनो आणि एरॉक्स नंतर, ‘यामाहा इलेक्ट्रिक स्कूटर’ लॉन्च लवकरच भारतात होत आहे.

  • यामाहा मोबिलिटी उत्पादक कंपनी
  • पॉवरफुल निओ इलेक्ट्रिक स्कूटर फीचर्स
  • निओ इलेक्ट्रिक किंमत

यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर

Yamaha Neo Electric Scooter

यामाहा मोटारसायकल, मोटरबोट, आऊटबोर्ड मोटर्स आणि इतर मोटार चालवल्या जाणार्‍या उत्पादनांचे उत्पादन करणारे जपानी मोबिलिटी उत्पादक कंपनीने स्वतःच पाहिलं ‘यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर’ मॉडेल भारतामध्ये लॉंन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘Yamaha Neo’ हि इलेक्ट्रिक स्कूटर सर्वात आधी यूरोप 2022 मध्ये लॉन्च झाली होती, आणि आता भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता, होणारा वापर आणि इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवस्था पाहून, 2024 मध्ये यामाहा मोटारसायकल कंपनीने- ‘यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर’ लॉन्च भारतामध्ये सुद्धा करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: रॉयल एन्फिल्डचे वर्चस्व संपणार! बुलेट संपवायला आली हि तुफान गाडी

यामाहा इलेक्ट्रिक स्कूटरची खासियत

खासकरून शहरी वापरकर्त्यांना उपयोगी पडेल अश्या डिझाईन आणि स्ट्रक्चर मध्ये जोडली गेलेली यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटर, हाय परफॉर्म करणारी 2.06 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे,  इलेक्ट्रिक मोटर आहे जी 40 kmph चा उच्च गती देते.या स्कुटरमध्ये लिथियम आयन बॅटरी पॅकमधून येते, जो रिमूव्हेबल आहे. या स्कुटरची बॅटरी चार्ज होण्यासाठी साधारण 4 ते 5 तासांचा अवधी लागतो. टच स्क्रीन डिस्प्ले, ओडोमीटर, डिजिटल मीटर, ट्यूबलेस टायर्स, अलॉय व्हील, फास्ट चार्जिंग, ब्लूटूथ, नेव्हिगेशन,इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि कॉल एसएमएस अलर्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस स्टार्ट डिस्क ब्रेक या अत्याधुनिक फीचर्स मधून हि इलेक्ट्रिक स्कुटर उपलब्ध असणार आहे.

वाचा: Best 7 Seater Car: मोठ्या फॅमिलीसाठी चार बेस्ट 7 सीटर कार, उत्कृष्ट 26 Kmpl मायलेज कमी किंमत

यामाहा निओ इलेक्ट्रिक किंमत

Ola आणि Ather च्या तुलनेचे फीचर्स असणारी आणि प्योर ईवी इप्लूटो 7 जी ,ओकिनावा प्रेजप्रो आणि Eblu Feo यांची प्रतिस्पर्धि असणारी यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ₹1.00 लाख (एक्स-शोरूम) इतकी असू शकते. हि रक्कम तुम्ही ठराविक डाउनपेमेंट करून हफ्त्यामध्येही कन्व्हर्ट करून घेऊ शकता.

वाचा: एथर 450 अपेक्सच्या लूकशी जुळणारी ‘Raptee Energy मोटरसायकल’, एक चार्जवर देते 150 किमी रेंज

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment