‘या’ कारणामुळे सर्वाधिक विकली जातेय Ola electric scooter !

Published:

Ola electric scooter 2024

2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीमध्ये सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर ओला इलेक्ट्रिकने विकल्या असून अजूनही या स्कूटरसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एथर, बाजासारख्या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपन्याना तोडीस तोड देत ओला इलेक्ट्रिकने आपल्या स्कूटरचा खप मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे, तुम्हाला खालील माहितीमध्ये Ola सर्वाधिक विकली जाण्याच कारण, कोणती ओला इलेक्ट्रिक स्कूटर चांगली बॅटरी रेंज आणि स्पीड देते? ओलाच्या किती वर्षाला स्कूटर विकल्या जातात यासोबत Ola Electric Scooter ची संपूर्ण माहिती सदर लेखात दिली आहे.

आजकाल इलेक्ट्रिक स्कूटरच्या अनेक कंपन्या उभारीस आल्या आहेत. तुम्ही एखादी स्कूटर विकत घेताना तुम्हाला हवे असलेले सर्व फिचर्स एका स्कूटरमध्ये मिळणं खूप मुस्कीलीच झालं आहे, काही स्कूटर चांगली रेंज देतात पण त्यामध्ये फिचर्सची कमतरता असते, काही फिचर्सने जबरदस्त असतात पण काही किंमतीने भरमसाठ पण अशी एकमेव Ola Electric Scooter आहे, ज्यामध्ये तुम्हाला हवे असणारे सर्व फिचर्स बजेटफ्रेंडली किंमतीमध्ये मिळतात. चला बघूया या टॉप-सेलिंग इलेक्ट्रिक स्कूटरची संपूर्ण माहिती.

ओला इलेक्ट्रिक ईयर ऑन ईयर सेलिंग

भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी लक्षात घेऊन ओला इलेक्ट्रिक ने अशी इलेक्ट्रिक स्कूटर बनवली जी ग्राहकाच्या गरजा भरून काढते.  2024 मध्ये या ओला स्कूटरची 36716 विक्री केली आहे.या स्कूटरच्या रेकॉर्ड ब्रेक कमाई नंतर ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष भावेश अग्रवाल यांनी एक खुशखबरी दिली आहे की , पुढील वर्षापासून ओला इलेक्ट्रिक स्वतःच्या ओला स्वतःच्या इलेक्ट्रिक स्कूटर साठी देशातच बॅटरी बनवेल. भाविश अग्रवाल हे तामिळनाडूमधील असणाऱ्या ओलाच्या गिगा फॅक्टरीमध्ये सुमारे 100 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करत आहेत, भविष्यात याच फॅक्टरीमध्ये ओलाच्या ओलासाठी बॅटरी सेल तयार केले जातील थोडक्यात ओला स्कूटरची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आणि या कंपनीचा विकास होण्यासाठी बरेच चांगले निर्णय घेतले गेलेले आहेत.

ओलाचे सर्वात विकले जाणारे मॉडेल

भारतामध्ये सध्या ओला तीन नवीन मॉडेल ऑफर करते. या इलेक्ट्रिक स्कूटरचे Ola S1 Pro, Ola S1 आणि Ola S1 Air हे सर्वात लोकप्रिय मॉडेल आहेत. ओला इलेक्ट्रिक क्रूजर आणि एडवेंचर इलेक्ट्रिक स्कूटर साठी खूप प्रसिद्ध आहे. या कंपनीची सर्वात लोकप्रिय आणि टॉप सेलिंग स्कूटर ही ओला S1 Pro असून स्कूटर ची किंमत 1,40 लाख इतकी आहे.  केवळ एका चार्जर दीडशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतर ही स्कूटर आरामात पार करू शकते.या मॉडेलचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

जनतेचे प्रश्न

ओला इलेक्ट्रिक आणि एथर एनर्जी मधील सर्वात बेस्ट स्कूटर कोणती आहे ?

दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंज-फीचर्स बाबतीत माहिती देता, ओला इलेक्ट्रिक मॉडेलचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रतितास इतका आहे तर एथरच्या मॉडेलचा टॉप स्पीड 90 किलोमीटर प्रतितास इतका आहे. ओलाच्या स्कूटर ची किंमत 1.30 हजारपासून चालू होते तर त्याच दरम्यान एथरची एथर मॉडेलची किंमत 1,26 हजार पासून चालू होते दोन्हींमधील बॅटरीची क्षमता रेंज आणि फीचर्स लक्षात घेता दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर स्पोर्टी कॉम्पॅक्ट आणि चांगल्या फीचर्सने भरलेल्या आहेत.

ओला स्कूटर एका चार्जमध्ये किती रेंज देते ?

ओलाचे लोकप्रिय वेरियंट S1, हे एका चार्जमध्ये 181 किलोमीटर इतकी रेंज देते.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड किती आहे ?

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास इतका आहे.

ओला इलेक्ट्रिक ची किंमत किती आहे?

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये सहा स्कूटर उपलब्ध आहेत; ज्यांची सुरुवातीची किंमत 70,000 पासून सुरू होते.

Photo of author

Ajinkya Sid

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment