Upcoming Cars: या तीन बहुप्रतीक्षित कार्स जानेवारीत लाँच होणार, यातील एकीचे नाव वाचून तुम्ही थक्क व्हाल

Upcoming Cars January 2024 Marathi – 2023 या वर्ष्यात सर्वात जास्त प्रतीक्षा असलेल्या कार्स शेवटी जानेवारी 2024 लाँच होणार असून नवीन वर्ष्याच्या सुरुवातीलाच कार प्रेमींना आनंदाचा धक्का मिळणार आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ह्युंदाई यांच्या या आगामी कार्स ची खूप चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळते.

Hyundai Creta Facelift

2020 मध्ये फेसलिफ्ट झालेल्या क्रेटाला फायनली 2024 मध्ये सर्वात मोठे अपग्रेडस मिळणार असून 1६ जानेवारी 2024 रोजी ह्युंदाईची सर्वाधिक विकली जाणारी C-सेगमेंट मिड-साईज SUV “क्रेटा फेसलिफ्ट 2024” चे अनावरण होणार आहे. 2020 मध्ये लाँच झाल्यापासून सेकंड जनरेशन क्रेटला कोणतेच मोठे अपडेट्स मिळाले न्हवते पण त्याच प्लॅटफॉर्म वर बनलेली ह्युंदाई ची सिस्टर कंपनी किया च्या सेलटॉस ला 2023 मध्ये मात्र फेसलिफ्ट अपडेट देण्यात आले.

आगामी ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट 2024 मध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच इंजिन आणि गियर ट्रान्समिशन पर्याय जैसे थे राहण्याची दाट शक्यता आहे परंतु ADAS आणि काही नवीन फीचर्स क्रेटात ऍड केले जातील ज्याने हि गाडी पूर्वी पेक्षा अधिक फीचर्सने रिच असेल ज्याने ड्रायविंग अनुभव अधिक आरामदायी आणि सुरक्षित होईल. क्रेटा 2024 लाँच झल्यावर या गाडीची प्रामुख्याने मारुती सुझुकी ग्रँड विटारा, टोयोटा अर्बन क्रूझर हायडर, फोक्सवॅगन टायगून, स्कोडा कुशाक आणि एमजी ऑस्टर या सी-सेगमेंट एसयूव्हीशी स्पर्धा सुरू राहील.

वाचा – Hyundai Creta facelift :नव्या फिचरसह ह्युंदाई क्रेटा कारच ‘फेसलिफ्ट’ जाणून घ्या नवे अपडेट आणि किंमत

Mahindra XUV300

खूप दिवसापासून XUV400 या इलेकट्रीक कारची टेस्टिंग सुरु आहे. अनेक वेळा टेस्टिंग दरम्यान स्पॉट झालेली हि SUV जानेवारी 2024 मध्ये आगमन करणार असून टाटा मोटर्सच्या इलेकट्रीक सेगमेंट मध्ये असलेल्या मोनोपॉलीला तोडण्यास सज्ज असेल. आगामी महिंद्रा XUV400 फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेल प्रमाणेच इलेक्ट्रिक बॅटरी आणि मोटर स्पेक्स असतील जे प्रकारा नुसार 375km आणि 456km ची रेंज ऑफर करते. सध्याचे मॉडेल हे 16.0 लाख (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे पण वाढीव फिचर आणि वाढती महागाई यामुळे अद्ययावत XUV400 ला छोटी का होईना पण दरवाढ झालेली पाहायला मिळू शकते.

वाचा – महिंद्रा थारने घेतले चक्क पाण्यातल्या बोटीचे रुप, हिमाचल प्रदेशातला वाहतूक कोंडीवर जीवघेणा उपाय

Tata Punch EV

सध्या इलेकट्रीक वाहन मार्केट दबदबा कुणाचा असेल तर तो टाटा मोटर्स या कंपनीचा. भारतीय ब्रँड, रिलायबल आणि मजबूत रचना यामुळे टाटा कंपनीची प्रत्येक ईव्ही मार्केट मध्ये जोरात चालते. कंपनीची पंच सीएनजी मध्ये लाँच झाल्यापासून जबरदस्त वेटिंग मध्ये हि गाडी विकली जात आहे पण या गाडीचा असा चाहता वर्ग आहे जो हे मॉडेल इलेकट्रीक अवतारात घेण्यासाठी प्रतीक्षा करत आहे त्यांच्या साठी कंपनी जानेवारी 2024 महिन्याच्या शेवटाला पंच ईव्ही लाँच करणार आहे.

पंच ईव्ही यामध्ये सध्याच्या पंचच्या डिजाईन पेक्ष्या मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे. नवीन पंच इव्ही मध्ये टाटा नेक्सन प्रमाणे समोरील आणि मागील भाग दिला जाऊ शकतो ज्यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प मिळायची अपेक्षा आहे. गाडीची पॉवर आणि बॅटरी फिगर टिगोर EV प्रमाणे दिली जाणार आहे ज्यामध्ये 55KW मोटर 75PS पॉवर आणि 170Nm टॉर्क सोबत 300 – 310km ची ड्रायव्हिंग रेंज मिळण्यासाठी 26 kWh बॅटरी.

पंच EV ची Citroen eC3 ला स्पर्धाअसेल त्यामुळे eC3 च्या Rs. 11.61 लाख (एक्स-शोरूम) किमतीच्या जवळपास कंपनीला पंच EV ची किंमत ठेवावी लागणार आहे.

वाचा – Best SUV Tata Nexon Price: इतकी आहे ‘नवीन टाटा नेक्सॉन’ ची भारतात किंमत

पंच EV ची Citroen eC3 ला टक्कर अपेक्षित आहे, ज्याची किंमत सध्या Rs. 11.61 लाख (एक्स-शोरूम). पंच EV ला Citroen eC3 पेक्षा जास्त प्रारंभिक किंमत मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे. तथापि, इलेक्ट्रिक Tata SUV ने मोबदल्यात Citroen पेक्षा खूप जास्त वैशिष्ट्ये ऑफर केली पाहिजेत. खाली टाटा पंच EV साठी आमची अपेक्षित किंमत पहा.

Photo of author

Ajinkya Sidwadkar

२०१० पासून ब्लॉग लिखाण करणारा अजिंक्य सध्या एक मराठी युट्युबर असून त्याला ऑटो मोबाइल क्षेत्रातील माहिती लिहिण्याची आवड आहे.

Leave a Comment