‘या किंमतीत’ Yamaha TMAX560 भारतात लाँच होण्याची शक्यता, जाणून घ्या फीचर्स आणि खासियत

Aishwarya Potdar

यामाहा, टू-व्हीलर भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात नवनवीन Yamaha Scooter लाँच करून लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे, आणि आता लवकरच यामाहा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वतःची फ्लॅगशिप SPORT SCOOTER, TMAX560  करत रिफ्रेश झाली आहे. Yamaha ने रीफ्रेश केलेल्या TMAX560 ला दोन व्हेरिएंट दिले असून, या व्हेरिएंटची किंमत 7.75 लाख रुपयापासून सुरू होते. यामाहाची हि स्पोर्ट्स स्कुटर कमालीची परफॉर्मेंस आणि आकर्षक लुक साठी ओळखली जाणार आहे.

2024 Yamaha TMAX560

जपानमध्ये यामाहाने TMAX560 ला सादर करत या मॉडेलला दोन व्हेरिएंट्स मिळाल्याची माहिती दिली, हे दोन व्हेरिएंट्स अनुक्रमे TMAX560 आणि TMAX560 Tech Max असून ह्यांची किंमत 13 लाख, एक्स-शोरूम (मलेशिया) आणि 7.75 लाख (जपान) हि आहे. TMAX560 आणि TMAX560 Tech Max या दोन प्रकारची वैशिष्ठे वेगवेगळी आहेत.

वाचा: हिरो मेवरिक 440: हंटर 350 ची छुट्टी करायला, हिरोची ‘क्रूझर बाईक’ लाँच

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

TMAX टेक MAX फीचर्स

कॉम्पॅक्ट बॉडी असणाऱ्या स्पोर्ट स्कूटर TMAX टेक MAX लॉन्ग- आरामदायी प्लश सीट्स, फूटबोर्डमुळे राईड अत्यंत आरामदायी होते, एलईडी लाइटिंग, गोल्ड-फिनिश USD टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क्स, मोनो-शॉक रिअर सस्पेंशन आणि एरोडायनामिक फ्रंट विंग्स या बाइकमध्ये स्पोर्टी लुक तयार करतात.  अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत,  ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, बेस्ट-इन-क्लास 7-इंच कलरफूल TFT स्क्रीनस,  नेव्हिगेशन, हीटेड सीट्स, हीटेड हॅन्डल्स, इलेक्ट्रिक स्क्रीन आणि क्रूझ कंट्रोल दिलेले आहेत.

वाचा: टोयाटोची नवीन शक्कल, तुमची आवडती टोयोटा कारची होणार ‘होम-डिलीवर’

2024 यामाहा TMAX560 इंजिन

TMAX टेक MAX या स्कुटर मध्ये 4-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड, DOHC, 4-वाल्व्ह,पॅरलल ट्विन-सिलेंडर इंजिन दिले आहे,  560 cc चे आहे. या इंजिनची 47.6 bhp इतकी पॉवर आणि 55.7 Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या स्कुटरची स्टार्टर सिस्टम इलेक्ट्रिक आहे.

यामाहा TMAX560 स्पेसिफिकेशन

स्कुटरचा समोरचा ब्रेक हायड्रॉलिक ड्युअल डिस्क ब्रेक असून हा ब्रेक 267 मिमी चा आहे तर मागील ब्रेक हायड्रोलिक सिंगल डिस्क ब्रेक असून हा ब्रेक 282 मिमीचा आहे. टेक MAX चा समोरचा टायर 120/70R15M/C 56H ट्यूबलेस तर मागचा टायर 160/60R15M/C 67H ट्यूबलेस आहे.

220 किलो वजनाच्या या स्कुटरची लांबी 2.195 मिमी, रुंदी 780 मिमी, उंची 1.415 मिमी – 1.525 मिमी (इलेक्ट्रिक विंडस्क्रीन), सीटची उंची 800 मिमी, व्हीलबेस 1.575 मिमी, ग्राउंड क्लीयरन्स 135 मिमी इतकी आहे. या स्कुटरच्या इंधन टाकीची क्षमता 15L आहे.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

TMAX टेक MAX किंमत

हि स्कुटर टेक ब्लॅक आणि गडद मॅग्मा या दोन रंगातून उपलब्ध आहे. या स्कुटरमध्ये स्मार्ट किलेस हा ऑप्शन दिला आहे. भारतामध्ये या स्कुटरला सुमारे रु. 8 लाख किंमतीमध्ये लाँच केले जाऊ शकते.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment Cancel reply

Exit mobile version