‘5 गॅरेंटेड टिप्स’ ज्यामुळे वाढेल, तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

EV tips: भारताचं भविष्य हे इलेक्ट्रिक वाहन (electric scooters) आहे, हे आता जगजाहीरच आहे. इव्ही स्कुटर बाबतीतली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उच्च दर्जाची बॅटरी आणि ठिकठिकाणी उपलब्ध असणारे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन; मात्र इतक्या सुविधा असूनही, कधी-कधी रायडर्सना इलेक्ट्रिक स्कुटर कमी रेंज देते आणि हा प्रॉब्लेम थंड वातावरणात किंवा हिवाळ्यात जास्त जाणवतो म्हणूनच यावर उपाय म्हणून इलेक्ट्रिक स्कूटरची श्रेणी म्हणजेच रेंज कशी वाढवायची, इलेक्ट्रिक स्कूटरची श्रेणी कशी टिकवायची आणि चांगली रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटरची यादी खालील लेखात पुरवत आहे.

5 टिप्स ज्याने वाढेल इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

ह्या ‘5 टिप्स’ वापरून वाढवा इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

एखादा व्यक्ती जेव्हा इलेक्ट्रिक स्कुटरची खरेदी करायला जातो तेव्हा त्याच्या डोक्यात इलेक्ट्रिक सेगमेंटमधल्या सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रिक स्कूटर, प्रवाशांसाठी सर्वोत्तम, लांब अंतरासाठी सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान स्कूटर या शंका असतात आणि या शंकासोबत सर्वात जास्त अपेक्षा असते ते म्हणजे चांगली रेंज देणाऱ्या बॅटरीकडून. प्रत्येक गाडीच्या बॅटरीची क्षमता हि वेगवेगळी असते. हि बॅटरी क्षमता रायडर करणाऱ्याचे वजन, रायडरची राइडिंग शैली, भूप्रदेश आणिचालू असणाऱ्या हवामानाची परिस्थिती यावर अवलंबून असतं.

वाचा: या ‘फॅमिली मेंबर’ ला घेऊन, एथर एनर्जीची बाजारात जोमात एंट्री

1. ओईएम प्रिस्क्राइड टायर प्रेशर मेन्टेन करा

टायरमध्ये असणाऱ्या प्रेशरचा इव्हीच्या बॅटरीशी डायरेक्ट संबंध असतो. जर तुमच्या इलेक्ट्रिक स्कुटरचे  टायर पूर्ण फुगले असतील तर प्रवास करताना फुगलेल्या टायरचा आणि जमिनीचा संपर्क कमी होतो, थोडक्यात रोलिंग प्रतिरोध कमी होतो ज्यामुळे ईव्हीच्या मोटारचं जास्तीच काम वाचत परिणामी इलेक्ट्रिक स्कुटरची राईड करताना बॅटरी पॅक ऊर्जा वाचून वीज निर्मिती आणि वापर कमी होईल. ज्यामुळे राईडरला ठराविक रेंजमध्ये अधिक प्रवासाचा अनुभव घेता येईल.

2. इव्हीमध्ये अनावश्यक इलेक्ट्रॉनिक्स फीचर्सचा वापर टाळा

आताच्या सर्वच स्कुटर नवनवीन हाय-एंड फीचर्सने भरपूर आहेत, ज्यामध्ये ब्लूटूथ, स्मार्ट नेव्हिगेशन, कॉल मेसेज स्मार्ट फीचर्स यांचा समावेश आहे. इलेक्ट्रिक स्कुटरची राईड घेताना जर हे इलेक्ट्रॉनिक्स फीचर्स बंद ठेवले तर यातून वीजबचत होते, परिणामी बॅटरीवर कमी दाब येऊन रायडर लॉन्ग रेंजचा राईड अनुभवू शकतो.

3. स्कुटरवरच वजन कमी करा

स्कुटरवर असणाऱ्या वजनाचा थेट परिणाम हा स्कुटरच्या बॅटरीवर होतो, होईल तितकी हलकी आणि कमी वजनाची राईड मुळे सुद्धा लॉन्ग रेंजचा तुम्हाला अनुभव मिळू शकतो.

4. स्पीड मर्यादित करा

इलेक्ट्रिक स्कुटर जर हळू आणि पॉवर सेव्हिंग मोडमध्ये चालवली गेली, तर स्पीड मेंटेन होऊन गाडीची बॅटरी वाचू शकते.

5. इलेक्ट्रिक स्कुटरची योग्य आणि नियमित देखभाल करा

इंधन वाहनाच्या तुलनेत कमी मेंटेनन्स असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कुटर वरायला एकदम सोप्या असतात. इव्हीमधले महत्वाचे पार्ट ब्रेक आणि ड्राईव्हट्रेन आहेत, ज्यांचा मेंटेनन्स योग्य आणि नियमित केला तर रायडर्स अधिक पल्ल्याचा प्रवास करू शकतात.

वाचा: नव्या ‘यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरला’ मिळणार, Ola आणि Ather सारखी खासियत

‘या’  सोप्या टिप्सने तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज टिकवा

हल्ली इलेक्ट्रिक स्कूटर्सचा सगळीकडे बोलबाला आहे, बरेच जण चांगल्या दर्जाची आणि चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक स्कुटर इंधन स्कुटरच्या तुलनेत विकत घ्यायला प्राधान्य देतात. इलेक्ट्रिक स्कुटरमुळे पर्यावरण तंदुरुस्त रहायला मदत होतेच शिवाय इंधन वाहनातून तयार होणाऱ्या कार्बोनच्या उत्सर्जनावर आळा बसतोच, त्यामुळे इंधन वाहनाच्या तुलनेत ईव्हीची विक्री होण्याचे  वाढले आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कुटर विकत घेतली असेल तर खूप सोप्या टिप्सने तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज टिकवू शकता.

  1. बॅटरी अपग्रेडेशन करा.
  2. वेग स्तिर ठेऊन पॉवर सेव्हिंग मोडमध्ये स्कुटर चालवा.
  3. रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर करा.
  4. उंच वळण टाळून सपाट मार्गाचा वापर करा.
  5. इलेक्ट्रिक स्कुटरची बॅटरी ओव्हरचार्ज करू नका.

चांगली रेंज देणाऱ्या ‘5 इलेक्ट्रिक स्कुटर’

भारतामध्ये दुचाकी सेगमेंटमध्ये अनेक चांगली श्रेणी बॅटरीची स्कुटर आहेत. ज्या तुम्हाला चांगली रेंज मिळवून देतात.

वाचा: Electric Honda Activa: ठरलं! या तारखेला लाँच होणार इलेकट्रीक होंडा ऍक्टिवा

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment