टाटा नेक्सॉन ईव्हीवर मिळतोय 2.30 लाखापर्यंत भरघोस डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनससुद्धा, ही घ्या माहिती

टाटाच्या लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग इलेक्ट्रिक कार नेक्सॉनवर भरघोस डिस्काउंट मिळत आहे, हा डिस्काउंट जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी दिला जात आहे. याचसोबत टाटा टियागो ईव्ही आणि टाटा टिगोर ईव्ही मॉडेलवर मिळत आहे. तुम्ही जर टाटाची इलेक्ट्रिक कार विकत घेण्याच्या विचारात असाल, तर हीच संधी आहे जिचा तुम्हाला कमालीची फायदा होणार आहे.

या नव्या वर्षाची मुहूर्तावर, अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या वाहनांवर कमालीचे डिस्काउंट ऑफर केलेले आहेत. यामध्ये ‘टाटा मोटर्स’ चे सुद्धा नाव असून, टाटा मोटर्सने जानेवारीमध्ये टाटा नेक्सॉन आणि टिआगो इलेक्ट्रिक कारवर ऑफर्स दिल्या होत्या डिस्काउंट ऑफरमधून केवळ टाटा पंच इलेक्ट्रिक ह्या कारला वगळण्यात आले होते.

टाटा नेक्सॉन ईव्ही डिस्काउंट

केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये टाटाच्या गाड्या ह्या दणकट आणि सुरक्षित म्हणूनच ओळखले जातात. त्यातल्या त्यात टाटाची इलेक्ट्रिक सेगमेंट तर जबरदस्तच आहे. टाटाने इलेक्ट्रिक क्षेत्रात एक-सो-एक वेहिकल मार्केटमध्ये आणून बाकी कंपन्यांची हवाच टाईट केलेली आहे. मार्च महिन्यात टाटा मोटरर्स त्याच्या नेक्सॉन इव्हीवर बंपर सूट देत आहे. ही सूट टाटा प्री-फेसलिफ्ट नेक्सॉन इव्हीवर देण्यात आलेली आहे. नेक्सॉन EV जवळजवळ 2.30 लाखापर्यंत डिस्काउंट आहे शिवाय तुमची जुनी कार टाटा इलेक्ट्रिक कारसोबत एक्सचेंज करणार असाल, तर तुम्ही एक्सचेंज बोनसचा सुद्धा फायदा घेऊ शकता. नेक्सॉन EV मॅक्सवर सुद्धा 2.65 चा भरघोस डिस्काउंट मिळत आहे.

वाचा: सुझुकी साजरा करतेय ‘जश्न-ए-10 लाख’, सुझुकी टू-व्हीलरचे रेकॉर्ड ब्रेकिंग प्रोडक्शन

वाचा: टाटा मोटर्सची हवा, टाटाच्या पंच आणि नेक्सॉनची रेकॉर्ड-ब्रेक विक्री

वाचा: महिंद्रा इलेक्ट्रिक थार देते, 400 किमीपेक्षा जास्त रेंज

टाटा नेक्सॉन ईव्ही एक्सचेंज बोनस

जरी या कंपनीने फेसलिफ्टेड नेक्सॉन ईव्ही मॉडल्सवर एक्सचेंज बोनस किंवा नो-कॅश डिस्काउंट दिला नसला तरी टाटा मोटर्स 2023 मध्ये बनलेल्या सर्व वेरियंट्स वर तब्बल 50,000 रुपयांपर्यंत ग्रीन बोनस देत आहे तर त्याच दरम्यान 2024 च्या मॉडेल्स वर सुद्धा 20,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही टाटा मोटर्स कडून मिळणाऱ्या डिस्काउंटची आणि एक्सचेंज बोनसची ही संधी अजिबात चुकवू नका. आता चला जाणून घेऊया या गाडीचे फीचर्स.

टाटा नेक्सॉन ईव्ही फिचर्स

टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकची बेस मॉडेलची किंमत साधारण 15.30 लाखापासून सुरू होते तर याच्या टॉप मॉडेलची किंमत 20.67 लाखपर्यंत आहे. ही कार महिंद्रा XUV400 आणि MG ZS EV ला टक्कर देणारी आहे. ह्या 5 सीटर एसयुव्हीची 465 किलोमीटर इतकी रेंज आहे. या एसयूव्हीच्या बाहेरील डिझाईन बाबतीत बोलता गाडीमध्ये एलईडी लाईट बार जे डीआरएलला कनेक्ट केलेले आहेत याचसोबत 16 इंचाचे आलोय व्हिल्स, LED लाईटबार, LED टेल लाईट आणि LED फॉर्म लाईटचा समावेश आहे. आतील बाजूस म्हणजे इंटीरियरबाबतीत माहिती- वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, इलेक्ट्रिक सनरूफ, OTA अपडेट्स, नऊ-स्पीकर म्युझिक सिस्टम आणि 360-डिग्री कॅमेरा सोबत इतर फिचर्सचा समावेश आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment