रेमंडच्या मालकाची 4 कोटीची सुपर स्पोर्टकार धूळ खातेय गॅरेजमध्ये ! या कारणामुळे ही कार चालवणं टाळतात, भारतीय उद्योगपती गौतम सिंघानिया

Aishwarya Potdar

रेमंड ग्रुपचे डायरेक्टर आणि भारतीय उद्योगपती – गौतम सिंघानिया यांचं नाव सध्या कौटुंबिक वादामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या जितकी चर्चा रेमंड ग्रुप गौतम सिंघानियाची होतेय त्यापेक्षा जास्त त्यांच्या कमाईची म्हणजे रेमंड ग्रुप गौतम सिंघानिया नेट वर्थ आणि रेमंड ग्रुप गौतम सिंघानिया कार कलेक्शनची होतेय. पण तुमच्यापेक्षा बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की ४ करोडची सुपरकार रेमंडच्या मालकाकडे धूळ खात पडून आहे. हो ! अगदी योग्य माहिती वाचत आहात, GS- गौतम सिंघानियाकडे जगातली अशी एक महाग कार- मासेराती MC20 आहे जी वापरणं म्हणजे सर्वात वाईट अनुभवाला सामोरे जाणे असे स्वतः GS म्हणजेच गौतम सिंघानिया यांचे म्हणणे आहे. चला जाणून घेवूया सिंघानिया यांनी या कारला सर्वात धोकादायक का म्हंटले? असे काय फिचर्स आहेत या कारचे? आणि ह्या कारची किंमत काय आहे? याची संपूर्ण माहिती.

रेमंडचे मालक गौतम सिंघानिया कार

या काळात गौतम सिंघानिया याचसोबत त्यांचे वडील विजयपत सिंघानिया आणि पत्नी नवाज मोदी सिंघानिया ज्या व्यवसायाने फिटनेस प्रशिक्षक आहेत यांची माहिती ‘सिंघानिया फॅमिली ड्रामा’ मुळे  इंटरनेटवर वेगाने शोधली जात आहे, त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये घडणाऱ्या हरएक हालचालीसोबत त्याच्या खाजगी आयुष्यात ते कसे राहतात? कोणती कार वापरतात? त्या कारचे फिचर्स काय- किंमत काय? म्हणूनच या माहितीमध्ये तुम्ही गौतम सिंघानिया यांची सर्वात महागडी Maserati MC20 कार याचे सर्व फिचर्स, किंमत आणि स्पेसिफिशन याची माहिती जाणून घेणार आहोत.

वाचा: CSK च्या कॅप्टनला भुरळ पडली टाटाच्या या कारची, कारमधले बसल्यावर बसले आश्चर्याचे धक्के

मासेराती MC20-किंमत आणि फिचर्स

भारतामध्ये मासेराती MC20 कारचे सादरीकरण 2021 मध्ये करण्यात आले होते. या कारची किंमत 3.65 कोटी इतकी असून, दोन दरवाजे आणि स्पोर्टी लुक असणारी ही कार केवळ एका वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, जिला Maserati MC20 Cup म्हणून ओळखलं जातं. या कारमध्ये स्विपिंग बॉडीलाईनसोबत अनेक आकर्षक फिचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले गेले आहेत जसे, बोनेटवर छोटा पण बोल्ड MC20 लोगो, काळ्या रंगातून फ्रंट स्पॉइलर, एकसंथ- फ्रंट ग्रिल, स्लीकर LED टेललॅम्प क्लस्टर. तर कारची आतील बाजूसुद्धा स्पोर्टी दिसण्यासाठी लेदरचे डॅशबोर्ड, बोल्ड स्टिअरिंग, सेंटर- स्टैक केलेली इन्फोटेन्मेंट सिस्टिम यासारख्या फिचर्सचा समावेश कारमध्ये केला आहे. दोन प्रवासी बसण्याची क्षमता असणारी ही कार 6 रंगामधून उपलब्ध आहे. ह्या कारला लॅम्बोर्गिनी सुपरकारपेक्षाही अधिक वेगवान मानले जाते. कारच्या आतील बसणाऱ्या प्रवाशयांच्या सेफ्टीसाठी कारमध्ये 4 एअरबॅग्स मिळतात.

वाचा: अरविंद केजरीवाल वापरतात ह्या कार, मारुतीची वॅगनआर सोबत या कारमधून दिल्लीचे मुख्यमंत्री करतात प्रवास

मासेराती MC20 कारच्या इंजिनबाबतीत माहिती देता, 3.0 लीटरचे पेट्रोल इंजिन कारमध्ये दिले आहे, जे 621 bhp इतकी पॉवर आणि 730 Nm इतका टॉर्क जनरेट करत, रिअर व्हील ड्राइव असणारी आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने चालणारी ही कार एका लीटरमध्ये 8.3 किमी इतके मायलेज देते.

वाचा: टॉप 5 सनरूफ असणाऱ्या SUV ज्यांची किंमत 10 लाखाच्या आतमध्ये आहे, ही वाचा लिस्ट

4 कोटीची कार गौतम सिंघानियाच्या गॅरेजमध्येच पडून असण्याचे रहस्य

गौतम सिंघानिया यांनी ह्या कारला वाईट कार म्हणूनसुद्धा संबोधित केले आहे, कारण ही महागडी कार आलिशान रोडवर चालवण्याऐवजी मुंबईमधल्या खड्याच्या रस्त्यावर चालवणे अतिशय धोक्याचे आहे, अस व यांचं म्हणणे आहे. एका दृष्ठीकोनातून मुंबईत दुचाकी वाहनसुद्धा चालवण्यास अवघड झाले आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये, अश्यात कोटीची कार गर्दीच्या आणि खडबड्या रस्त्यावर घेवून जाणे म्हणजे त्याहून धोक्याचे. यांच कारणामुळे सिंघानिया यांनी या कारला सर्वात धोक्याची कार अशी उपमा दिली आहे.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment