अरविंद केजरीवाल वापरतात ह्या कार, मारुतीची वॅगनआर सोबत या कारमधून दिल्लीचे मुख्यमंत्री करतात प्रवास

Arvind Kejriwal latest news of car : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल सध्या त्याच्या अरेस्ट झाल्याच्या बातमीमुळे प्रचंड चर्चेत आले. पण ह्या अरविंद केजरीवाल अरेस्ट ब्रेकिंग न्यूज़ अथवा केजरीवाल लेटेस्ट न्यूजपेक्षा लोक सर्वात कार कलेक्शन किंवा दिल्लीचे चिफ मिनिस्टर कोणती कार सध्या वापरतात ? ही माहिती जाणून घ्यायला जास्त उत्सुकता दाखवतं आहेत; या उत्सुकतेमागच कारणही तसंच आहे, कारण दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल बऱ्याच वेळा कोणत्याही एसयुव्ही सारख्या गाड्यांमध्ये प्रवास ना करता चक्क वॅगनआर मध्ये प्रवास करताना दिसून आले.

हो! अगदी योग्य बातमी वाचत आहात, पण सध्या चालू घडीमध्ये हे केजरीवाल कोणती कार वापरतात? या कारच्या किंमती काय आहे? फिचर्स काय आहेत? हे जाणून घ्यायचं असेल तर खालील माहिती संपूर्ण वाचा.

अरविंद केजरीवाल यांचे कार कलेक्शन

सध्या केजरीवाल अटकेची चर्चा सर्वत्र वाऱ्याच्या वेगाने होत आहे. बऱ्याच जणांना केजरीवाल यांना अटक का झाली? किंवा केजरीवाल का जेलमध्ये आहेत? याच कारणसुद्धा माहिती नसेल तर केजरीवालाना अटक ही दारू-धोरण घोटाळा प्रकरणात करण्यात आली असून, अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. हे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व याआधी त्याच्या वैगन- आर कारच्या वापरसाठी आणि त्यानंतर अचानक कारच्या चोरीमुळेसुद्धा चर्चेत आलं होत. मारुती सुझुकीची टॉप सेलर वैगन- आर ही कार अरविंद केजरीवाल वापरत असे, त्यानंतर त्यांनी बऱ्याच इतर कंपनीच्या कार वापरल्या आहेत, त्या सर्व कारची माहिती खालील यादीत मिळेल.

वाचा: सिट्रॉन इ-सी3 कारचे सेफ्टी रेटिंग बघून बसेल तुम्हाला आश्चर्याचा धक्का, कार विकत घेताना करा पुन्हा विचार

एम जी ग्लॉस्टर

आम आदमी जनतेचे अध्यक्ष अनेकदा एम जी ग्लॉस्टर या कारमधून प्रवास करताना दिसून आले आहेत, या कारची किंमत 43 लाख इतकी असून, गरजेच्या अश्या सर्व सेफ्टी आणि अडवान्सड फीचर्सने भरलेली हि कार आहे. ऑटोमॅटिक ट्रांसमिशनने चालणारी हि कार 7 सीटर आहे.

वाचा: AI च्या मदतीने बनली Honda ची जाहिरात, ‘या’ तीन होंडा SUV वर वापरला AI इफेक्ट

टोयोटा इनोव्हा

टोयाटोची हि कार मॅन्युअल ट्रान्समिशनमधून उपलब्ध असून, ह्या कारची आसनक्षमता 7-8 प्रवाश्यांची आहे. ह्या कारची किंमत 8.35 लाख इतकी आहे. एअरबॅग्स, किलेस एंट्री, रिअर कॅमेरा पार्किंगसारखे अनेक अद्वनकसद फीचर्स या मध्ये दिले गेलेले आहेत. केजरीवाल अनेकदा या कारमधून प्रवास करताना दिसून आले.

वाचा: हल्ल्यापासून वाचण्यासाठी सलमान खानने खरेदी केली, ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार. जाणून घ्या सेफ्टी आणि फिचर्स

महिंद्रा अल्तुरास G4

केजरीवाल यांना महिंद्राच्या या Mahindra Alturas G4 कॅरमध्येसुद्धा अनेकदा प्रवास करताना पहिले गेले आहे, पॉवर स्टिअरिंग,इंजिन चालू बंद करण्यासाठी बटण, वेंटिलेटेड सीट्स आणि 360 डिग्री कॅमेरासोबत इतर एडवांस्ड फिचर्सने ही कार भरलेली आहे, ह्या कारची किंमत 32 लाखापर्यंत आहे.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment