हल्ल्यापासून वाचण्यासाठी सलमान खानने खरेदी केली, ही 4 करोडची बुलेटप्रुफ कार. जाणून घ्या सेफ्टी आणि फिचर्स

Nissan Bulletproof Patrol SUV: नुकताच सलमान खानच्या घराबाहेर दोन व्यक्ती गोळीबार करुन फरार झाले, आणि ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरली. ह्या गोष्टीमुळे सलमान खानचे अगदी घराबाहेर पडणे सुद्धा मुश्किल झाले आहे, आणि ही अडचण लक्षात घेऊन सलमान खानने स्वतःच्या संरक्षणासाठी एक अशी बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. ज्यामुळे सलमान खानच्या सुरक्षितेमध्ये अजून भर पडण्यात आली आहे. ह्या कारचे नाव आहे; निसान पेट्रोल बुलेटप्रुफ कार. चला जाणून घेवूया या एसयुव्हीची संपूर्ण माहिती.

बुलेटप्रुफ कार म्हणजे काय ?

सलमान खानची नवीन खरेदी केलेली कार आहे निसान पेट्रोल एसयुव्ही. बुलेटप्रुफ कारची खासियत तिचे एडवांस्ड आणि शार्प फिचर्स, पॉवरफुल इंजिन आणि सर्वात महत्वाचं सर्व बाजूंनी आतील बसणाऱ्याला मिळणार प्रोटेक्षण म्हणजेच सुरक्षितता. सलमानच्या बुलेटप्रूफ कारच्या कलेक्शन मध्ये टोयटोची लँड-रोवर तर होतीचं, पण आता निसान पेट्रोल एस्युव्हीचा सुद्धा समावेश झाला आहे. बुलेटप्रुफ कारमध्ये बी7 लेव्हलची संरक्षण दिले जाते. थोडक्यात माहिती द्यायची झाली तर स्निपल रायफल किंवा प्राणघातक हल्ले यासारख्या अपघातापासून संरक्षण होईल, अश्या मटेरिअलपासून कार बनते. आणि हे मटेरियल कारच्या दरवाज्याना, खिडक्यांना , कारच्या रुफला, इंधन टाकीला अगदी टायर्सला सुद्धा दिलं जात, आणि इतक्या सगळ्या प्रोटेक्षण नंतर ती कार बुलेटप्रूफ कार बनते.

वाचा: आता कियाच्या लोवर व्हेरिएंटलासुद्धा मिळणार सनरूफ, जाणून घ्या नव्या वेरिएंट्सची किंमत

सलमान खानने खरेदी केलेली कार- निसान पेट्रोल एसयुव्ही

सलमान खानने ही कार uae मधून इम्पोर्ट केली आहे. 4 करोडपर्यंतच्या किंमतीमध्ये विकल्या जाणाऱ्या ह्या कारची सर्वात जास्त विक्री uae मध्ये जास्त होते. या काही दिवसात सलमान खानला या कारमधून प्रवास करताना अनेकदा पाहण्यात आले आहे. ह्या कारचे इंजिन अतिशय शक्तिशाली आहे. ह्या कारमध्ये 4 व्हील ड्राइवचा ऑप्शन मिळतो. हे इंजिन टोयोटाच्या फॉर्च्युनरच्या तुलनेत डबल पॉवर जनरेट करते. या कारमध्ये 2 इंजिनचा पर्याय मिळतो, एक 4.0 लिटरचे V6 इंजिन आणि 5.6 लिटरचे V8 इंजिन. V6 इंजिन हे 279PS पॉवर – 394Nm टॉर्क तर V8 इंजिन 406PS पॉवर-560 Nm टॉर्क जनरेत करत.

वाचा: एथर एनर्जीची बॅटरी फेकली 40 फुटावरून, पाहा पुढं काय झालं?

निसान कार फिचर्स आणि किंमत?

कारच्या एडवांस्ड फिचर्समध्ये पुढच्या बाजूला मोठी 12.3 इंचाची टचस्क्रीन आणि मागच्या बाजूला 10.1 इंचाची एंटरटेनमेंट स्क्रिन मिळते, सोबत 7 इंचाचा ड्राइवर डिस्प्ले दिला जातो. इतर एसयुव्ही कारच्या एडवांस्ड फिचर्सप्रमाणे ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल,वायरलेस फ़ोन चार्जारसाखे फिचर्स या कारमध्ये मिळतात. या कारमध्ये तुम्हाला काही अधिक एडवांस्ड किंवा सेफ्टी फिचर्स बसवायचे असतील तर तेसुद्धा तुम्ही या कस्टिमाईझ करुन घेवू शकता. आता इतक्या साऱ्या सेफ्टीने आणि फिचर्सने भरलेली एडवांस्ड कार 4 करोडच्या किंमतीमध्ये सलमान खानने खरेदी करुन कस्टमयिझ केलेली आहे.

वाचा: ‘नाद करा पण टाटाचा कुठं’ ,नेक्सॉनने क्रॅश टेस्टिंगमध्ये सर्वांचा टाकलं मागे

भारतामध्ये बुलेटप्रुफ कार बनवणाऱ्या कंपन्या

सध्या भारतांमध्ये काही अश्या कंपन्या आहेत, ज्या इनबिल्ड बुलेटप्रूफ कार बनवतात. त्यामध्ये टोयटोची फॉर्चुनर, टोयटोची इनोवा क्रिस्टा, रेंज-रोव्हर ईवोक, मर्सिडी बेंझ GLE 350 d आणि बीएमडब्लू 7 सिरीज. ह्या कंपनीच्या कार तुम्हाला अगदी 100% सेफ्टी आणि परफॉमन्स देतात.

Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment