‘टॉप 10 कार ॲक्सेसरीज’ ज्यामुळे तुमच्या कारला येईल टॉप-मॉडेलचा फील

Aishwarya Potdar

Updated on:

कार ही एक अशी गोष्ठ आहे, जिच्या ठेवणीवरून लोकांचा तुमच्याकडे बघायचं दृष्ठिकोन बदलतो, जर तुमची कार एकदम आलिशान, ब्रॅंडेड असेल पण कारमध्ये घाणेरडा वास येत असेल किंवा कारचे फ्लोर स्वच्छ नसेल किंवा तुमच्या कारमध्ये बसल्यावर कम्फर्टेबल, आलिशान जाणवत नसेल, कारमध्ये लाइटिंग चांगली नसेल किंवा महागड्या कारमध्ये गरजेचे सेफ्टी ॲक्सेसरीज नसतील तर लोक ‘लंगूर के हाथोमे अंगूर’ अश्याच नजरेने तुम्हाला बघतात.

टॉप 10 कार ॲक्सेसरीज

कोणतीही आकर्षक कार घ्यायची म्हंटली तर त्या ठराविक कारचे टॉप मॉडल घ्यायला लोकांचा अट्टाहास असतो कारण त्या टॉप मॉडेलमध्ये मिळणाऱ्या ॲक्सेसरीज. पण आता बाजारात अश्या काही ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या बेस मॉडल कारला एकदम टॉप-मॉडेलचा फील आणि लुक येऊ शकतो. खालील यादीमध्ये तुमच्या कारमध्ये टॉप 10 ॲक्सेसरीज दिल्या आहेत ज्यामुळे तुमची कार सोयीसुविधानी सुसज्ज आणि आलिशान वाटेल.

वाचा: ‘स्वस्तात मस्त’ टाटाची Altroz Racer, टाटाची डायरेक्ट ह्युंदाईशी टक्कर

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 

10. डैशबोर्ड कॅमेरा

कारचे बेस मॉडल असो अथवा टॉप मॉडल प्रत्येक कारमध्ये डैशबोर्ड कॅमेरा हा असावा, अनावधानाने काही गंभीर प्रसंगी हा कॅमेरा चालू स्थिती रेकॉर्ड या कॅमेरा मध्ये करुन ठेवतो, ज्यामुळे वाईट प्रसंगी डैशबोर्ड कॅमेरा एक पुरावा म्हणून कामी येतो.

9. इंटीरियर वॉक्युम क्लिनर 

कुटुंबासोबत, खासकरून लहान मुलांसोबत फिरताना अथवा प्रवास करताना कारमध्ये वस्तू- गोष्टीची सांड होन ही अगदी साधारण बाब आहे, आणि अश्याच प्रसंगी इंटीरियर वॉक्युम क्लिनर ही गोष्ठ कमी येते, छोट्यातल्या छोट्या कण शोषून प्लॅफॉर्म स्वच्छ करण हे काम हे वाक्युम क्लीनर करतो.

वाचा: कमी पैशात अधिक सुरक्षा देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, 100 किमीपेक्षा जास्त रेंज देणारी कोमाकीची फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर

8. एयर फ्रेशनर

कारमध्ये कुटुंबासोबत, मित्रासोबत वेगवेगळी ठिकाण फिरत असताना कारमध्ये दुर्गंध येणं खूप स्वाभाविक बाब आहे, हा दुर्गंध दूर होण्यासाठी ​​एयर फ्रेशनरची खूप मदत होते. सध्या बाजारात वेगळवेगळया वासाचे एयर फ्रेशनर मिळतात.

7. फर्स्ट-ऐड-किट

कारमध्ये आवर्जून असावीच अशी एक गोष्ठ म्हणजेच फर्स्ट ऐड किट. अगदी छोट्यातल्या-छोट्या खरचटण्यापासून प्राथमिक उपायापर्यंत सर्व गरजेच्या वस्तू ह्या किटमध्ये मिळतात.

वाचा: आता कियाच्या लोवर व्हेरिएंटलासुद्धा मिळणार सनरूफ, जाणून घ्या नव्या वेरिएंट्सची किंमत

6. टायर प्रेशर मॉनिटर वॉल्व

लांबचा प्रवास करत असताना टायर प्रेशर मॉनिटर वॉल्व तुमच्यापाशी असलाच पाहिजे, ह्या वॉल्वमध्ये दिलेल्या तीन रंगाच्या स्तरावरून तुमच्या कारच्या टायरमधले प्रेशर मोजले जाते.

5. कार सिट हेडरेस्ट हुक

कारमध्ये बसणाऱ्या इतर पॅसेंजरना उपयोगी पडणारी ही गोष्ठ आहे, मागील पॅसेंजरच्या वस्तू, बाटली अथवा पर्स अडकवण्यासाठी कार सिट हेडरेस्ट हुक कमी येतात.

4. कार क्लिनिंग जेल 

ह्या जेलच्या वापर कारमध्ये हाताने स्वछ एन होणाऱ्या चिकट धुळीच्या कणाना स्वच्छ करण्यासाठी होतो. अगदी एसी मधील धूळसुद्धा या कार क्लिनिंग जेलच्या मदतीने काढता येते.

3. ब्लाइंड स्पॉट मिरर 

ड्रायव्हरला त्याच्या बाजूला कोणते वाहन आहे, किती लांब-जवळ आहे, याची माहिती ब्लाइंड स्पॉट मिररच्या मदतीने मिळते. अपघात टाळण्यासाठी आणि राईड सुखकर होण्यासाठी या ब्लाइंड स्पॉट मिररची खूप मदत होते.

 2. फोन माउंट टूल

अक्सिडेंट होण्याचे कारण बरेचदा गाडी चालवताना फोनवर बोलणे हे असतं, पण फोन माउंट टूल ह्यामुळे अपघात होण्यापासून बरेचदा मदत होते, आपला फ़ोन- मोबाईल या टुलवर अडकवून अगदी कार चालवताना सुद्धा फोनवर बोलणे सुरू राहते.

1. डॅशबोर्ड अँटी- स्लिप मॅट 

बऱ्याच वेळ कारच्या डॅशबोर्डवर असणाऱ्या गोष्टी ड्रायव्हरच्या पायाशी घसरून ड्रायव्हरला अनकंफर्टेबल रायीडचा अनुभव आला असेल तर अश्या वेळी डॅशबोर्ड अँटी- स्लिप मॅट कामी येत, या मॅटवर ठेवलेल्या वस्तू हलत-सरकत नाहीत.

👉🏻 कार, टू-व्हिलर्सच्या माहिती आणि ऑफर्ससाठी जॉईन करा व्हाट्सऍप ग्रुप 
Photo of author

Aishwarya Potdar

मला ऑटोमोबाइल फिल्डमधली माहिती वाचायला आणि या ब्लॉगच्या मदतीने तुमच्यापर्यंत सरळ, सोप्या मराठी भाषेत मांडायला खूप आवडते. २०१९ पासून मी ह्या क्षेत्रात वेगवेगळ्या ब्लॉगवर काम करत आहे. तुम्हाला ह्या पेजवर नवीन कार, इलेक्ट्रिक कार-बाईक आणि स्कूटर याचसोबत ऑटोमोबाईलमधील येणारे नवे अपडेट यांची संपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Comment